Panchadashi पञ्चदशी

Vidyaranya Swami

पंचदश म्हणजे पंधरा. विवेक, दीप व आनंद अशी तीन मुख्य प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाचे पाच भाग आहेत. असे एकूण पंधरा भाग मिळून ह्मा ग्रंथाची रचना केली आहे. विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध विचारपूर्वक केलेली निवड. दीप म्हणजे विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश. आनंद हे ब्रह्माचे स्वरूप असून त्याचे प्रकार व साधने पंचदशीकार स्वामी श्री विद्यारण्यतीर्थ यांनी या ग्रंथात सांगितली आहेत.